ब्लॉग : बालेकिल्ला सुरक्षित ठेवण्याची भाजपची रणनिती
Published On: Nov 16 2017 6:42PM | Last Updated: Nov 16 2017 6:42PM
Published in Marathi Daily Newspaper, Pudharihttp://www.pudhari.news/news/National/article-about-Gujrat-elections-BJP-Congress/m/
- दीपक पर्वतियार, ज्येष्ठ पत्रकार, गुजरात
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा बालेकिल्ला असणार्या गुजरातवर सध्या सर्वांच्या नजरा लागून आहेत. गुजरातमध्ये 9 आणि 14 डिसेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. भाजप पक्ष स्थापन झाल्यापासून गुजरातमध्ये 1995 मध्ये पक्षाने पूर्ण बहुमताने सत्ता स्थापन केली. तेव्हापासून प्रत्येक विधानसभा निवडणुकीत भाजपने यश मिळविले आहे. 2012 च्या निवडणुकीत भाजपने 182 पैकी 115 जागांवर विजय मिळविला. या पेक्षा कमी जागा कधी पक्षाने मिळविल्या नाहीत. उलट याच निवडणुकीत गुजरात परिवर्तन पक्षाचे 2 उमेदवार विजयी झाले होते. या पक्षाने भाजपला पाठिंबा दिल्याने सरकारमधील संख्याबळ 117 वर गेले.
याउलट काँग्रेसचा विचार करता काँगे्रसला 2012 च्या निवडणुकीत 60 चा आकडा ओलांडला आला. या निवडणुकीत काँग्रेसला 61 जागा मिळाल्या; पण याचा परिणाम 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दाखविता आला नाही. कारण, या निडणुकीत काँग्रेसला खातेच उघडता आले नाही, तर भाजपने सर्व 26 जागांवर विजय मिळविला. शिवाय, शंकरसिंह वाघेला यांच्या रूपाने काँग्रेला आणखी एक मोठा धक्का बसला. या वर्षी ऑगस्टमध्ये वाघेला यांनी समर्थक 13 आमदारांसह पक्षाला रामराम ठोकला. शंकरसिंह वाघेला यांनी आपला ‘जन विकल्प’ नावाचा नवीन पक्ष स्थापन करून गुजरात विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली. त्यासह अन्य लहान पक्षही या निवडणुकीत आहेत. मात्र, खरी लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्येच आहे.
गुजरातमध्ये 2002 मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. यानंतर सलग तीन वेळा त्यांनी येथे विजय मिळविला. मात्र, 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर ते दिल्लीत दाखल झाले आणि भारताचे 15 वे पंतप्रधान बनले. यानंतर विविध राज्यांतील निवडणुकांत त्यांनी विजय मिळविला. मात्र, उत्तर प्रदेश निवडणुकीतील विजय सर्वाधिक मोठा होता. येथे 403 जागांपैकी 324 जागांवर पक्षाने विजय मिळविला. आता गुजरातमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी 182 पैकी 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, भाजप हे लक्ष कितपत साध्य करते याकडे लक्ष लागून आहे. कारण, विविध मुद्द्यांमुळे या निवडणुकीत समीकरणे बदलण्याइतपत परिणाम झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्रिपद भूषविणार्य माजी मुख्यमंत्री आनंदीबने पटेल आणि विद्यमान मुख्यमंत्री विजय रूपानी यांचे कधीही बिनसले नाही. ही मोदींच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. मात्र, राजकीय विश्लेषकांच्या मते मोदी यांच्यानंतर पाटीदार समाजाच्या आंदोलनाचा मुद्दा तेथील नेतृत्वाला व्यवस्थित हाताळता आला नाही. तसेच अन्य समाजांतील नेतृत्वही विविध मुद्द्यांवर पुढे आले. यामध्ये तरुण नेतृत्वाने आपले स्थान निर्माण केले आहे. यामध्ये पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, ओबीसी नेते अल्पेश ठाकोर आणि दलित नेत जिग्नेश मेवानी यांचा येथे प्रभाव वाढला. यामुळे राजकाणाच्या दृष्टीने जातीय मतांच्या समीकरणांवर याचा परिणाम झाला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी हार्दिक पटेल यांचा वादग्रस्त सेक्स व्हिडीओ व्हायरल झाल्याने आता गुजरातच्या निवडणुकीत वेगळाच रंग भरला आहे.
भाजपसाठी दोन निराशाजनक घटनाही घडल्या. यामध्ये 2015 मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शहरी भागात भाजपने आपला जनाधार कायम ठेवला आहे. 6 महापालिकांमध्ये भाजपला यश आले. मात्र, ग्रामीण भागात काँग्रेसने उचल खाल्ली आहे. दुसर्या बाजूला पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या नर्मदा आणि गौरव यात्रेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे या सर्व गोष्टींचा निकालावर कोणता परिणाम होतो हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजपसाठी दोन निराशाजनक घटनाही घडल्या. यामध्ये 2015 मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शहरी भागात भाजपने आपला जनाधार कायम ठेवला आहे. 6 महापालिकांमध्ये भाजपला यश आले. मात्र, ग्रामीण भागात काँग्रेसने उचल खाल्ली आहे. दुसर्या बाजूला पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या नर्मदा आणि गौरव यात्रेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे या सर्व गोष्टींचा निकालावर कोणता परिणाम होतो हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
राहुल गांधी यांनी गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येथे प्रचाराचा धडाका लावला. काँग्रेसकडून ‘गुजरात नवसर्जन यात्रा’ आयोजित करण्यात आली होती. या मध्यमातून राहुल गांधी यांनी विविध ठिकाणी रॅली काढल्या. तसेच हिंदू मतांचा विचार करून विविध मंदिरांमध्ये जाऊन पूजा केली. तसेच नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. ही काँग्रेसची वेगळी रणनीती दिसून आली.
राहुल गांधी यांनी जीएसटी आणि नोटाबंदीवरून सरकारवर टीकेची झोड उटविली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही प्रचार सभा घेऊन भाजपच्या या दोन्ही निर्णयांवर आसूड ओढले. या सर्व घटना-घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी प्रचाराची भक्कम फळी उभी केली आहे. अमित शहा यांनी तर घरोघरी जाऊन सरकारच्या कामांची माहिती जनतेला सांगण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आतापर्यंत जवळपास 30 सभांच्या माध्यमातून संवाद साधला आहे. तसेच निवडणूक कार्यक्रम लागू होण्यापूर्वी विविध विकासकामांचे उद्घाटन केले आहे. या माध्यमातून मोदी आणि शहा यांनी आपला बालेकिल्ला सुरक्षित ठेवण्यासाठी रणनीती आखली आहे. अखेर पंतप्रधान मोदी यांनी गुजरातचे विकास मॉडेल अद्यापही स्थिर असल्याचे या माध्यमातून ठासून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
Comments
Post a Comment